10th Yr Raigad Takmak Rappelling & GadDarshan 200


गिरिविहंग ट्रेकर्स, मुंबई

गिरिविहंग ही एक संस्था नसून निसर्गाशी सुसंवाद साधणारी एक विचारधारा आहे. हिचा जन्म साधारणत: १९९५-१९९६ साली राजमुद्रा या नावाने झाला. प्रत्येक संस्था सुरवातीला एक छोटेसे रोपटे असते आणि या रोपट्याचे एका विशाल वटवृक्षामध्ये रूपांतर व्हावे असे प्रत्येकालाच वाटत असते. एक विचार जो मनात घर करून गेला की आपली संस्था ही नोंदणीकृत संस्था झाली पाहिजे. परंतु संस्थेच्या
नोंदणीच्या वेळेस म्हणजेच डिसेंबर २००२ साली कायदेशीर अडचणीमुळे राजमुद्रेचे रूपांतर गिरिविहंग असे झाले.

गिरिविहंगंच्या नावावर दोन यशस्वी मोहिमांची मोहोर आहे. त्यापैकी लोणवळा-भीमाशंकर एकदिवसीय पदभ्रमण मोहिम करणारी गिरिविहंग ट्रेकर्स हीएकमेव संस्था आहे. तसेच संस्थेने पन्हाळगड़-विशालगड़ एकदिवसीय मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे.

ह्या संस्थेने अनेक परंपरा गेली १०-१२ वर्षे सातत्याने व प्रमाणिकपणे चालू ठेवल्या आहेत. त्यात काही गोष्टींचा आवर्जून उल्लेख करावसा वाटतो तो म्हणजे श्रावणमासी विविध मार्गाने भीमाशंकर पदभ्रमण आयोजित करणे, लहान मुलांसाठी निसर्ग साहस शिबिर आयोजित करणे तसेच नाणेघाट रेपलिंग आणि रायगड टकमक रेपलिंग व गड़ दर्शन आयोजित करणे.

यामध्ये रायगड टकमक रेपल्लिंग व गड़दर्शन हा संस्थेचा जणू मानबिंदुच. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. या कार्यक्रमाचे नेतुत्त्व घेणे ही एक अभिमानाची गोष्ट असते. तसेच रायगड रेपल्लिंग करने तेवढेच रोमंचाने भरलेले आव्हान असते. टकमक आपणाला नेहमीच आव्हान देत असतो. आणि आम्ही त्याच्या आव्हानाला नम्रपणे सामोरे जावून ते स्विकारतो.

या वर्षी संस्थेच्या या मानबिंदुचा म्हणजेच रायगड टकमक रेपल्लिंग व गड़दर्शन या कार्यक्रमाला बरोबर १० वर्षे पूर्ण होत आहे. तर चला रायगडाला! टकमक आपल्याला परत एकदा आव्हान देत आहे. मग तुम्ही तयार आहात न! चला तर रायगडला चला!

Girivihang Trekkers a non-profit making organization of amateur Trekkers & Nature Lovers is proud to organize his 10th year of Raigad program, since its inception in 1995 .

Raigad is King of Fort!!! and It's thrilling experience to rappell down from TakMak Tok @ Raigad... So Friends get set ready for thrill !!!

Details are as follows:

Date: 1st & 2nd Nov 2008
Departure on 31st Oct night from Mumbai

Fees:

Rs.1300/- per person

Rs.1000/- for School students.

Fees include Bus travel To & From, MTDC Stay & Food Expenses.

Leader: Nilam Thakur – 9869344456
Co Leader: Sachin Raut / Jyoti Salunkhe

Contact: Kunal Shinde – 9821753813

Visit us on Orkut : http://www.orkut.co.in/Main#Community.aspx?cmm=26642643

Jai Bhavani Jai Shivaji – Girivihang Trekkers0 comments:

 
Places Near Mumbai Copyright © 2010 Blogger Template Sponsored by Trip and Travel Guide